Monsoon Rain Comes At Nagpur

मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी नागपूरला जोरदार तडाखा दिला. सायंकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी वादळवाऱ्यासह टपोऱ्या थेंबाचा पाऊस पडला. पावसाने दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर एकात्मतानगरात घराची भिंत पडली. पूर्व समर्थनगरात एफसीआय गोडाऊनच्या मागे पडलेल्या झाडाखाली मारोती व्हॅन अशी चेपल्या गेली. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. 
सायंकाळी पाच वाजता अचानक ढगांची दाटी होऊन शहरात अनेक ठिकाणी टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला. जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याने सिव्हिल लाइन्स, सीताबर्डी, रामदासपेठ, अजनी व अन्य भागांमध्ये रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते. वादळी वाऱ्यामुळे अजनी परिसरातील पूर्व समर्थनगर (एफसीआय गोडाऊनच्या मागे) आणि सोमलवाडा येथे दोन झाडे कोसळली.
नागपूर वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात मान्सूनला अद्याप दोन ते तीन दिवस लागणार आहेत. दक्षिण-पश्‍चिम मान्सूनने नाशिक व सोलापूरमध्ये धडक दिली असून, गुजरातमध्येही सर्वत्र स्थिरावला आहे. अशीच अनुकूल स्थिती कायम राहिल्यास येत्या 48 तासांत नागपुरात मान्सूनचे आगमन होऊ शकते, असे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

FREE SMS ALERT !

मोफत जॉब अलर्ट, रिझल्ट्स, सिल्याबस, टाईमटेबल थेट तुमच्या Mobile मध्ये SMS द्वारा मिळवण्या साठी तुमच्या Mobile Number सोबत सबस्क्राइब करा

यह प्रस्ताव लिमिटेड समय के लिए है |
सदस्य बनें