सायंकाळी पाच वाजता अचानक ढगांची दाटी होऊन शहरात अनेक ठिकाणी टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला. जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याने सिव्हिल लाइन्स, सीताबर्डी, रामदासपेठ, अजनी व अन्य भागांमध्ये रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते. वादळी वाऱ्यामुळे अजनी परिसरातील पूर्व समर्थनगर (एफसीआय गोडाऊनच्या मागे) आणि सोमलवाडा येथे दोन झाडे कोसळली.
नागपूर वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात मान्सूनला अद्याप दोन ते तीन दिवस लागणार आहेत. दक्षिण-पश्चिम मान्सूनने नाशिक व सोलापूरमध्ये धडक दिली असून, गुजरातमध्येही सर्वत्र स्थिरावला आहे. अशीच अनुकूल स्थिती कायम राहिल्यास येत्या 48 तासांत नागपुरात मान्सूनचे आगमन होऊ शकते, असे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment